अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By Admin | Updated: June 17, 2014 20:42 IST2014-06-17T19:49:41+5:302014-06-17T20:42:06+5:30

एका ५५ वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू

Unidentified Ima escapes from the train and dies | अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू

अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू

कुरुम : एका ५५ वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंदुरा ते कुरुमदरम्यान बत्तीवाले बाबा दर्ग्यापासून एक किमी अंतरावर घडली. मृतकाच्या पिशवीत एक कंदील, भाकरीचे तुकडे व पीठ तसेच खिशात बँक ऑफ इंडियाची चिठ्ठी सापडली असून, त्यावर राजेशकुमार बिंद नागपूर असे लिहिलेले आहे. मृतकाचा वर्ण सावळा असून, बांधा सडपातळ आहे. उंची १६२ सेमी असलेल्या सदर इसमाने निळ्या रंगाची जिन्स पँट व निळसर रंगाचे शर्ट परिधान केलेले आहे. अशा वर्णनाच्या इसमाची ओळख पटविण्यासाठी माना पोलिस स्टेशनला संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास एएसआय कामताप्रसाद मिश्रा करीत आहेत. 

Web Title: Unidentified Ima escapes from the train and dies