शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:58 IST

अपघातात गंभीर जखमी झालेला युवक अर्धातास घटनास्थळावर पडून होता.

ठळक मुद्देगणेश अरूण घाटोळ (२८)असे मृत युवकाचे नाव आहे.अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली.त्याला उचलून उपचारासाठी नेण्यास कुणीही मदत केली नाही.

वाडेगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने युवक ठार झाल्याची घटना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ १० डिसेंबर रोजी घडली. गणेश अरूण घाटोळ (२८)असे मृत युवकाचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झालेला युवक अर्धातास घटनास्थळावर पडून होता.वाडेगाव येथील गणेश अरुण घाटोळ हा युवक दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्राजवळून जात होता. दरम्यान, अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. युवक दुचाकीसह खाली कोसळला होता.खाली पडल्यावर त्याला उचलून उपचारासाठी नेण्यास कुणीही मदत केली नाही. उलट या युवकाचे मोबाइलमध्ये फोटो काढण्यात घटनास्थळावरील लोकांनी धन्यता मानली. अखेर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने या गंभीर जखमी युवकास डॉ. मो.फैजान व रुग्णवाहिकाचालक जीवन इंगळे यांनी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ.मो. फैजान यांनी दिली. 

दोन दिवसात चौथा अपघातवाडेगाव पसिरात गेल्या दोन दिवसात हा चौथा अपघात झाला आहे. परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात घडत आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे, तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहे. गेल्या दोन दिवसात हा चौथा अपघात घडला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात