अज्ञात वाहनाचा दुचाकीस धक्का;  दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:06 IST2021-01-06T16:04:46+5:302021-01-06T16:06:24+5:30

Accident News रामकृष्ण बागराज पवार (५०) राहणार खैरी (आसेगाव पूर्णा ) हे गंभीर जखमी झाले.

Two-wheeler collision with unknown vehicle; Two-wheeler injured | अज्ञात वाहनाचा दुचाकीस धक्का;  दुचाकीस्वार जखमी

अज्ञात वाहनाचा दुचाकीस धक्का;  दुचाकीस्वार जखमी

ठळक मुद्देउपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर - सिरसो फाटा दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले असून बुधवारी सकाळी ९:३० वाजता सिरसो फाट्यावर एका दुचाकीस अज्ञात वाहनाने धक्का मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला असलेल्या खड्डय़ात पडून इसम गंभीर जखमी झाला.
                मूर्तिजापूर - दर्यापूर रस्त्याचे नुतनीकरण व रुंदीकरन झाल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ६ जानेवारी रोजी रामकृष्ण बागराज पवार (५०) राहणार खैरी (आसेगाव पूर्णा ) हे आपल्या मुलीच्या पत्रिका वाटून गावाकडे दुचाकी क्रमांक एमएच २७ बीसी ८६३४ ने गावी परत जात असताना सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान सिरसो फाट्यावर अज्ञात वाहनाने धक्का मारल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटताच भरधाव दुचाकी घेऊन ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दगडावर आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Two-wheeler collision with unknown vehicle; Two-wheeler injured