आणखी दोघांचा मृत्यू; ३६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST2020-12-04T04:51:48+5:302020-12-04T04:51:48+5:30

अकोला, अकोलखेड येथील दोघांचा मृत्यू बुधवारी जठारपेठ येथील ५६ वर्षीय पुरुषाचा हॉटेल रेजेन्सी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Two more died; 36 new positives, 13 beat corona | आणखी दोघांचा मृत्यू; ३६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात

आणखी दोघांचा मृत्यू; ३६ नवे पॉझिटिव्ह, १३ जणांची कोरोनावर मात

अकोला, अकोलखेड येथील दोघांचा मृत्यू

बुधवारी जठारपेठ येथील ५६ वर्षीय पुरुषाचा हॉटेल रेजेन्सी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १३ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. अकोलखेड, ता. अकोट येथील ४५ वर्षीय रुग्णाचाही मृत्यू झाला. त्यांना २८ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड चाचण्यांमध्ये १० पॉझिटिव्ह

रविवारी झालेल्या एकूण १२० रॅपिड ॲंटिजेन चाचण्यांमध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २५,४७६ चाचण्यांमध्ये १८०३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

५९३ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८६११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Two more died; 36 new positives, 13 beat corona