बोरगाव मंजूजवळ कार अपघातात दोघांचा मृत्यू, राष्ट्रीय महामार्गावरील घटना, अन्य पाच जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:39 IST2026-01-29T17:39:14+5:302026-01-29T17:39:52+5:30

जखमींमध्ये मोनू मुरली हारोळे, शिवा मुरली हारोळे, रोहित खुशरंग मायवाड, बामी मायवाड यांचा समावेश आहे.

Two killed in car accident near Borgaon Manju akola incident on national highway, five others injured | बोरगाव मंजूजवळ कार अपघातात दोघांचा मृत्यू, राष्ट्रीय महामार्गावरील घटना, अन्य पाच जण जखमी

बोरगाव मंजूजवळ कार अपघातात दोघांचा मृत्यू, राष्ट्रीय महामार्गावरील घटना, अन्य पाच जण जखमी


बोरगाव मंजू (जि. अकोला): राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नवीन बायपास वाय-पॉईंटजवळ धावत्या कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात खुशरंग भिलुजी मायवाड (वय ५०) व अनिता खुशरंग मायवाड (वय ४८, दोघेही रा. बैतूल, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये मोनू मुरली हारोळे, शिवा मुरली हारोळे, रोहित खुशरंग मायवाड, बामी मायवाड यांचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथून मध्यप्रदेशातील बैतूलकडे परत जात असताना कार क्रमांक एम.पी. ४८ झेड.एच. ४८२२ च्या डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहन पूर्णपणे उलटले. अपघातानंतर परिसरातील शेतात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख, गजानन तिडके, नितीन बोपुलकर व इतर शेतकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रमोद डोईफोडे, किशोर सोळंके, शुभम फलके व ज्ञानेश्वर जामोदे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढून अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ व पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे करीत आहेत.

Web Title : बोरगांव मंजू के पास कार दुर्घटना में दो की मौत, पांच घायल

Web Summary : बोरगांव मंजू के पास राष्ट्रीय राजमार्ग पर एक कार दुर्घटना में दो लोगों की मौत हो गई और पांच घायल हो गए। टायर फटने से नासिक से बेतुल जा रही कार पलट गई। स्थानीय किसानों और पुलिस ने घायलों को बचाने में मदद की, जिन्हें इलाज के लिए अकोला ले जाया गया।

Web Title : Two killed, five injured in car accident near Borgaon Manju.

Web Summary : A car accident near Borgaon Manju on the national highway resulted in two fatalities and five injuries. A tire burst caused the vehicle, traveling from Nashik to Betul, to overturn. Local farmers and police assisted in rescuing the injured, who were transported to Akola for treatment.