दिवसभरात दोघांचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह, ४१ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 18:14 IST2021-01-16T18:14:02+5:302021-01-16T18:14:07+5:30

CoronaVirus जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ३२८ झाला आहे.

Two deaths during the day, 29 new positives, 41 beat corona | दिवसभरात दोघांचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह, ४१ जणांची कोरोनावर मात

दिवसभरात दोघांचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह, ४१ जणांची कोरोनावर मात

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ३२८ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,११७ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व पुर्वा काम्पलेक्स येथील प्रत्येकी दोन, तर पिंजर ता. बार्शिटाकळी, अकोट, डाबकी रोड, जूने शहर, तरोडा कसबा ता. बालापूर, आदर्श कॉलनी, बलवंत कॉलनी, शिवाजी नगर, जिल्हा परिषद कॉलनी, दिपक चौक, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, कौलखेड, रतनलाल प्लॉट, आनंद नगर, हिंगणा रोड, राजेश्वर मंदिर, नयागाव व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.खदा

खदान व अकोट येथील दोघांचा मृत्यू

शनिवारी आरोग्य नगर, खदान येथील ६० वर्षीय पुरुष व अकोट येथील ५२ वर्षीय या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दोघांनाही अनुक्रमे १ जानेवारी व १३ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

४१ जणांना डिस्चार्ज

शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २७ अशा एकूण ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६०९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,११७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,१८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

 

 

Web Title: Two deaths during the day, 29 new positives, 41 beat corona