शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

राकाँला हवेत दोन मतदारसंघ

By admin | Updated: September 8, 2014 00:12 IST

आघाडीच्या चर्चेवर अकोला जिल्ह्यातील राकाँचे भवितव्य ठरणार.

अकोला : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबतची अंतिम चर्चा येत्या बुधवारी दिल्लीत होणार असून या वाटाघाटीतच अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे. आघाडीबाबत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात दोन मतदारसंघावर दावा करणार्‍या राष्ट्रवादीकडील एकमेव मतदारसंघ काँग्रेसने मागितला असून त्याबदल्यात दर्यापूर मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने तर स्वतंत्र प्रचार सभांचा नारळ फोडून यात भरच घातली आहे. असे असले तरी आघाडी होईलच, असे अनेक पदाधिकार्‍यांना वाटते. आघाडी झाली तर अकोला जिल्हय़ातील दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावेत, यासाठीचे सादरीकरण पक्षाच्यावतीने राकाँच्या पक्षश्रेष्ठीकडे करण्यात आले आहे. यामध्ये मूर्तिजापूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आम्ही सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मांडली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही याच मतदारसंघावर दावा केला आहे. ग तवेळच्या पराभवाचे दाखल देत हा मतदारसंघ काँग्रेसला देऊन त्याबदल्यात दर्यापूर हा शेजारचाच राखीव मतदारसंघ देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणताही निर्णय झाला नसला तरी आघाडीतील जागा वाटप आणि म तदारसंघ अदलाबदलनंतर मूर्तिजापूर मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, मूर्तिजा पूरसह अकोला पूर्व किंवा पश्‍चिम या दोन मतदारसंघापैकी एक मतदार संघ राष्ट्रवादीला मिळावा, यासाठीचे प्रयत्न जिल्हा नेत्यांकडून केले जात असून, हा निर्णय मात्र पक्षश्रेष्ठींनीच सोडवावा; पण या दोनपैकी एक मतदारसंघ द्यावाच, अशी आग्रही या भूमिका नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांनी मूर्तिजापूर म तदारसंघाचा पाया राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला असल्याचे वक्तव्य क रून त्या मतदारसंघावर राकाँचाच दावा ठोकला आहे. तथापी निर्णय मात्र पक्षनेतृत्वच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ** आघाडीसाठी प्रफुल पटेल अनुकूल धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम असावी, यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल अनुकूल असून, ९ व १0 सप्टेंबर रोजी आघाडीबाबत दिल्लीत सोनिया गांधी व शरद पवार यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत प्रफुल पटेल सहभागी होणार आहेत.