पांगरा येथे तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; अकाेल्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई 

By राजेश शेगोकार | Published: May 17, 2023 06:04 PM2023-05-17T18:04:00+5:302023-05-17T18:04:21+5:30

पांगरा येथे घरात तलवारी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी कारवाई केली.

Two arrested for carrying swords in Pangra Action in the wake of tension in Akola | पांगरा येथे तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; अकाेल्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई 

पांगरा येथे तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; अकाेल्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई 

googlenewsNext

अकाेला : अकाेल्यात गेल्या शनिवारी घडलेल्या दगडफेक व हाणामारीच्या प्रकरणानंतर पाेलीस यंत्रणा सजग झाली असून पातुर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत पांगरा येथे  घरात तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पांगरा येथे घरात तलवारी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, सुधाकर करवते, योगेश डाबेराव, हर्षल श्रीवास, उज्ज्वला, यांनी सापळा रचून धाड टाकली असता, वेगवेगळ्या दोन घरात दोन लोखंडी तलवारी ठेवल्याचे आढळून आले.

चान्नी पोलिसांनी दोन्ही तलवारी जप्त करून आरोपी मोरेश्वर रामभाऊ गवई ५२, तुषार रामराव कोकाटे ३०, दोघे रा. पांगरा यांच्याविरुद्ध कलम ४,२५ भारतीय शास्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: Two arrested for carrying swords in Pangra Action in the wake of tension in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.