शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच महिन्यात मिळणार दोनदा साखर

By admin | Updated: August 19, 2014 01:17 IST

दहा महिन्यानंतर जुलै महिन्यातील साखरेचा पुरवठा गेल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) जिल्ह्यात झाला.

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गेल्या दहा महिन्यानंतर जुलै महिन्यातील साखरेचा पुरवठा गेल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) जिल्ह्यात झाला. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना या साखरेचे वितरण सुरू करण्यात आले असतानाच ऑगस्ट महिन्यातील साखर पुरवठय़ाचा करानामादेखील गेल्या गुरुवारी झाला आहे. त्यामुळे एकाच महिन्यात जिल्ह्यातील गरिबांना दोनदा रास्त भावाच्या साखरेचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बीपीएल आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भावाच्या साखरेचे वितरण केले जाते. त्यासाठी शासनामार्फत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना साखर वितरित करण्याकरिता दरमहा २ हजार ७८६ क्विंटल साखरेचा पुरवठा केला जातो; मात्र गेल्या सप्टेंबरपासून साखरेचा पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे रास्तभाव दुकानांमधून मिळणार्‍या स्वस्त भावाच्या साखर लाभापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दहा महिने वंचित राहावे लागले. दरम्यान, शासनामार्फत वाराणसी येथील कंत्राटराकडून जुलै महिन्यातील २ हजार ७८६ क्विंटल साखरेचा पुरवठा गेल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) करण्यात आला. उपलब्ध साठय़ातून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना साखरेचे वितरण सुरू करण्यात आले असतानाच, ऑगस्ट महिन्यातील सणासुदीच्या अतिरिक्त साठय़ासह जिल्ह्यासाठी ३ हजार ६८५ क्विंटल साखर पुरवठा करण्याकरिता पुणे येथील बारामती अँग्रो लि.सोबत १४ ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा विभागामार्फत करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील साखरेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे एकाच महिन्यात जिल्ह्यातील गरिबांना दोनदा रास्तभावाच्या साखरेचा लाभ मिळणार आहे.