शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीच्या भीतीने आजारावर घरीच उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 10:31 IST

CoronaVirus News नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे.

अकोला : वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे घरोघरी रुग्णांची संख्या वाढली असून, चाचणीच्या भीतीने लोक घरीच उपचार घेत असल्याचे वास्तव आहे. योग्य उपचार न मिळाल्याने गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव होत असून, वेळीच चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मात्र अनेक जण चाचणीच्या भीतीने घरीच उपचार घेत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या भीतीने लोक चाचणी टाळत आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनादेखील गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. साधा ताप, सर्दी असा समज घे‌ऊन घरीच उपचार करणारे रुग्ण कुटुंबातील इतर सदस्यांच्याही संपर्कात येत आहेत. कुटुंबातील लोक घराबाहेरील इतर लोकांच्या संपर्कात येत असल्याने कोविडच्या संसर्गाची साखळी निर्माण होत आहे. नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलावही वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची गरज असून, लक्षणे दिसताच कोविडची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

लक्षणे दिसताच स्वत:ला आयसोलेट करा

सर्दी, खोकला आणि ताप म्हणजे कोरोना नाही. वातावरणातील बदलांमुळेही आरोग्यविषयक या समस्या उद्भवू शकतात, मात्र खबरदारी म्हणून अशी लक्षणे दिसताच रुग्णांनी एका खोलीत स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. इतरांच्या संपर्कात न येता वेळेतच कोविड चाचणी करून घ्यावी.

 

कुठे करावी चाचणी

कोविड ओपीडी सर्वोपचार रुग्णालय

भरतीया रुग्णालय, मनपा

आयएमए सभागृह

त्रीसूत्रीचे पालन करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी अजूनही प्रभावी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोविडच्या संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या अनुषंगाने नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच वारंवार दात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहे. घरी उपचारापेक्षा नागरिकांनी कोविड चाचणी करून घ्यावी. तसेच इतरांनाही कोविड चाचणीसाठी प्रोत्साहित करावे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला मंडळ, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या