शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो, धावत्या गाडीतच दाखल करा तक्रार!

By admin | Updated: July 15, 2015 23:46 IST

जीआरपी व आरपीएफ जवानांसह कोच कंडक्टर, कोच अटेंडन्ट व गार्ड येतील मदतीला!

राम देशपांडे / अकोला: रेल्वेमध्ये दरोडा, साहित्य चोरी किंवा महिला छेडखानीची घटना घडल्यास पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी लागत होती. पण, आता ही सुविधा धावत्या प्रवासी गाड्यांमध्ये उपलब्ध झाली असून, १0 जुलैपासून संपूर्ण देशात या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये घडलेल्या दरोड्याच्या, चोरीच्या वा छेडखानीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यास रेल्वे पोलीस अपयशी ठरतात. जवळच्या रेल्वे स्थानकावरील जीआरपी किंवा आरपीएफ पोलिसांकडे फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस तपास सुरू होतो. या प्रक्रियेस लागणार्‍या वेळेत आरोपी फरार होतात.अशा घटनांसंदर्भात प्रवाशांना धावत्या गाडीमध्येच तक्रार दाखल करता येईल यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील होते. १0 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यापुढे धावत्या गाडीमध्ये साहित्य चोरी, दरोडा किंवा महिला छेडखानी किंवा इतर कुठलीही अप्रिय घटना घडल्यास, प्रवाशांना तत्काळ त्याच गाडीमध्ये कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ किंवा जीआरपी पोलिसाजवळील तक्रार रजिस्टरमध्ये लेखी फिर्याद दाखल करता येणार आहे. अशा अटीतटीच्या प्रसंगी जीआरपी किंवा आरपीएफ पोलीस उपलब्ध नसल्यास, घटनेची फिर्याद दाखल करून घेण्याचा अधिकार कोच कंडक्टर, कोच अटेंडन्ट व गार्डला देण्यात आला आहे. याकरिता संबंधित अधिकार्‍यांकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये छापील स्वरूपातील एफआयआर अर्ज उपलब्ध राहणार आहेत. संबंधित अधिकारी घटनेची माहिती जवळच्या स्थानकावरील रेल्वे पोलिसांना देतील, आणि त्या आधारे रेल्वे पोलीस सापळा रचतील. सध्याच्या घटकेला आरपीएफ पोलीस १३00 गाड्यांमध्ये व जीआरपी पोलीस २ हजार २00 गाड्यांमध्ये नियमित तपासणी करण्याचे कार्य करीत आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या माध्यमातून रेल्वे अधिकार्‍यांनी केले आहे. धावत्या गाडीमध्ये प्रवाशांना तक्रार नोंदविता यावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांंपासून रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित होती. यासंदर्भात निर्देश प्राप्त झाले असून, भुसावळ मंडळात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आरोपीला तत्काळ अटक करण्यासाठी हे बदल प्रभावी ठरणार असल्याचे भुसावळ येथील मंडळ सुरक्षा अधिकारी विजय नायर यांनी स्पष्ट केले.