शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू विक्री करणारे रडारवर !

By admin | Updated: March 9, 2015 02:03 IST

शैक्षणिक संस्थाच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा शासनाचा निर्णय.

खामगाव (जि. बुलडाणा): शैक्षणिक संस्थाच्या आवारात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांंच्या विक्री बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवार ७ मार्च रोजी घेतला आहे. या निर्णयान्वये शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखू विक्री करणार्‍यांवर कार्यवाही करण्यात येणार असून, तंबाखू पदार्थांंच्या सेवनाच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करण्याचाही संकल्प राज्य शासनाचा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये समाजात व्यसनांचे प्रमाण वाढीस लागल्याचे निर्दशनास आल्यानंतर राज्य शासनाच्यावतीने गुटखा आणि तत्सम पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. तथापि, शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांंच्या विक्रीमुळे विद्या र्थ्यांंना शालेय दशेपासून तंबाखू आणि इतर पदार्थांंचे व्यसन जडत असल्याचे निर्दशनास आले आहे. दरम्यान, शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांंच्या विक्रीबाबत राज्य शासनाच्यावतीने मनाई करण्यात आली असून, शैक्षणिक संस्थांपासून १00 मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांंची विक्री केल्यास २00 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंना तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणामही माहीत करून देण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच युवा पिढीला व्यसनांपासून परावृत्त करण्याकरिता जनजागृती शासनाकडून निर्माण करण्यात येणार आहे.