शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सेवानवृत्त नगर परिषद कर्मचा-यांचे १८७ कोटी थकीत

By admin | Updated: January 8, 2015 00:32 IST

नगर परिषद संचालनांच्या आयुक्तांनी अल्टिमेटम देऊनही परिस्थिती जैसे थे.

मंगरूळपीर (वाशिम) : नवृत्तीनंतर दिल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या आर्थिक लाभापोटी राज्यभरातील नगर परिषद सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे १८७.९ कोटी रूपये शासनाकडे थकित आहेत. याप्रकरणी काही सेवानवृत्त कर्मचार्‍यांनी न्यायालयात दाद मागितल्याने नगर परिषद संचलनालयाच्या आयुक्तांना न्यायालयासमोर हजर राहावे लागले होते. त्यापृष्ठभूमिवर सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या लाभाची रक्कम चार टप्प्यांमध्ये अदा करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व नगर परिषदांना दिले असले तरी, या आदेशाचेही पालन नगर परिषदांकडून होत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील नगर परिषद कर्मचार्‍यांना सेवानवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ निर्धारित मुदतीत अदा करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित नगर परिषदांची आहे; परंतु राज्यात याच्या विपरित परिस्थिती दिसून येत आहे. नगर परिषद कर्मचारी सेवानवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या हक्काचा आर्थिक लाभ वेळेवर मिळत नसल्यामुळे राज्यातील हजारो कर्मचारी आर्थिक हलाखीचा सामना करीत आहेत. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगर परिषद प्रशासन संचलनालयाने पाहणी केली. त्यानुसार मे २0१४ पर्यंत राज्यातील सेवानवृत्त नगर परिषद कर्मचार्‍यांचे १८७.९ कोटी रूपये थकित असल्याचे स्पष्ट झाले. सर्व नगर परिषदांनी त्यांच्या सेवानवृत्त कर्मचार्‍यांना लाभाची ही रक्कम नोव्हेंबर २0१४, १४ जानेवारी २0१५, ३१ मार्च २0१५ आणि ३१ मार्च २0१६ या चार टप्प्यात अदा करण्याचे आदेश नगर परिषद संचलनालयाच्या आयुक्तांनी दिले होते. त्यासाठी नगर परिषदांनी मालमत्ता क र व पाणीपट्टीची वसुली ९0 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त करण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित होते. लाभाची रक्कम चार टप्प्यांमध्ये दिल्यानंतरही, आणगी थकित निघाल्यास २0१५- १६ या आर्थिक वर्षाकरीता १३ व्या वित्त आयोगातून प्राप्त होणार्‍या निधीतून ५0 टक्के निधी सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे लाभ देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने वापरावा, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत. नगर परिषद संचलनालयाने १८ ऑक्टोबर २0१४ रोजी दिलेल्या या आदेशाला राज्यातील नगर परिषदांनी केराची टोपली दाखवली. आयुक्तांच्या आदेशानुसार नगर परिषदांनी सेवानवृत्त कर्मचार्‍यांना लाभाचा पहिला टप्पा नोव्हेंबर २0१४ मध्ये देणे अपेक्षित होते; मात्र या पहिल्या टप्प्यातही सेवानवृत्तांच्या पदरी निराशाच आली. आता दुसरा टप्पा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असून, यावेळी तरी आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सेवानवृत्त कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत आहे.