शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

देऊळगावराजामध्ये जबरी चोरी : खामगावात रोकड लंपास

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. भुरट्या चोरांसोबतच अट्टल चोरटेही सरसावले आहेत. आज २२ जुलैच्या पहाटे देऊळगावराजा येथे चोरट्यांनी शस्त्राच्या धाकावर लुटमार केली असून, बुलडाणा तालुक्यातील धाड येथे पानटपरी फोडली. संध्याकाळी ४ च्या सुमारास खामगाव येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये अंगावर घाण टाकून ७१ हजाराची रोकड लंपास केली. चोरांच्या वाढलेल्या हिमतीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चोरांना जिल्हा मोकळा, असेच चित्र सध्या दिसत आहे.

** देऊळगावराजा : शहरातील चिखली रोडवर असलेल्या तीन कॉलनी वसाहतीत अज्ञात चार चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत शस्त्राच्या धाकावर लुटमार करत एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी पहाटे ४ ते ४.३0 वाजेच्या सुमारास घडली.
अज्ञात चोरट्यांनी रात्री १.३0 वाजेपासून आदर्श कॉलनी, उंबरखेड रस्त्यावरील शिवाजी पार्क आणि विजय वाईन बार समोरच्या नवीन कॉलनीला आपले लक्ष्य बनवले. यावेळी शिवाजी पार्क परिसरातील मान्टेच्या घरात भाडेकरू असलेल्या गिते नामक विद्यार्थ्याच्या घरात प्रवेश करून सामान, मोबाईल आणि २00 रूपये घेवून गेले. त्यानंतर आदर्श कॉलनीत घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरल्याने परत डिघोळे यांच्याकडे असलेले भाडेकरू टेकाळे यांच्या घरात प्रवेश करून डिजीटल कॅमेरा लंपास केला. डॉ.अतुल गिते यांच्या हॉस्पीटलमध्ये मेडिकल स्टोअर व्यावसायिक संजय सखाराम नागरे यांचे घर डिघोळेंच्या समोर आहे. नागरेंच्या घरात बाजुचे लोखंडी ग्रील तोडून प्रवेश केला. मात्र संजय नागरे यांना जाग आल्याने त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता आधीच चिडलेल्या चारही चोरट्यांनी संजय नागरे यांच्यावर हल्ला चढवला. संजय नागरे यांच्यावर चाकूने मान, पाठ आणि पोटावर वार करत पायावर काठीने मारल्याने ते गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशात असलेले सात हजार रूपये पॅन्टसह घेवून पलायन केले. संजय नागरे यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले. त्यांना तातडीने दे.राजा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथम दिपक हॉस्पीटल नंतर आधार हॉस्पीटल जालना येथे हलविण्यता आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संजय नागरे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हिवाळे आणि कर्मचारी घटनास्थळाकडे धावले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्‍वेता खेडकर दाखल झाल्या. श्‍वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे मोटारसायकल किंवा चारचाकी वाहनातून पसार झाल्याने शोध लागला नाही. संजय नागरे यांचे भाडेकरू भागवत रामदास चेके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरूध्द जबरी चोरी अप.क्र. ६९/१४ कलम ३९४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

** अंगावर घाण टाकून ८१ हजार लंपास
खामगाव : बँकेत भरावयास आणलेली शेतकर्‍याची ८१ हजार रुपये रोकड चोरट्यांनी अंगावर घाण टाकून लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास स्थानिक पंजाब नॅशनल बँकेत घडली. प्राप्त माहितीनुसार घाटपुरी येथील श्रीधर कॉलनीतील रहिवासी दशरथ भगवंतराव चर्‍हाटे (वय ५४) हे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदुरा रोडवरील पंजाब नॅशनल बँकेत ८१ हजार रुपये भरावयास आले. दुपारी मध्यान्ह भोजनाची वेळ झाल्याने कॅशीयरने नंतर पैसे भरा, असे सांगितल्याने दशरथ चर्‍हाटे हे बँकेबाहेर उभे राहिले. दरम्यान, चोरट्यांनी ही संधी साधून दशरथ चर्‍हाटे यांच्या अंगावर घाण टाकली व काका ही घाण साफ करा, असे म्हणून चर्‍हाटे हे घाण साफ करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील ८१ हजार रुपये रोकड लंपास केली. पैसे चोरी झाल्याची माहिती नंतर चर्‍हाटे यांना समजताच तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या घटनेबाबत दशरथ चर्‍हाटे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

** स्वीटमार्ट फोडून ६0 हजाराचा माल लंपास
धाड : स्थानिक बसस्टँण्ड लगत असणार्‍या एका पान मसाला व स्वीटमार्ट दुकानात अज्ञात चोरट्यांनी २१ जुलैच्या रात्री दुकान फोडून पानमसाला मटेरीयलसह सिगारेट व इतर साहित्य असा अंदाजे ६0 हजाराचा माल लंपास केल्याची माहिती आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, धाडच्या बसस्थानकालगत म.वकील म.जलील यांचे अमर पान मसाला व स्वीटमार्ट सेंटर असून, २१ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला व दुकानामधून अंदाजे ६0 हजाराचा माल लंपास केला. सदर घटना पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. यासंदर्भात कुणीही तक्रार दिली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)