तीन दिवस मद्य विक्री बंद

By Admin | Updated: June 19, 2014 22:08 IST2014-06-19T20:45:13+5:302014-06-19T22:08:08+5:30

मतदान केंद्रापासून ५ किलोमिटर अंतरावर असणारे सर्व मद्यविक्री केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

Three days off alcohol sales | तीन दिवस मद्य विक्री बंद

तीन दिवस मद्य विक्री बंद

नांदुरा : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक २0 जून रोजी होणार असून कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी म्हणून १८ ते २0 जून पर्यंत सर्व मतदान केंद्रापासून ५ किलोमिटर अंतरावर असणारे सर्व मद्यविक्री केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे तसे आदेश सर्व देशी विदेशी मद्य विक्रेते, परवाना कक्ष व बिअरबार मालकांना आज १८ जूनच्या दुपारी ४.४0 वाजता देण्यात आले आहेत.
दरम्यान आजच बुलडाणा जिल्हा परवानाधारक दारु विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूसेठ राठोड यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म.रा.मुंबई यांना फॅक्सव्दारे निवेदन पाठविले आहे. सदर निवेदनात नमुद केले आहे की, आज पर्यंत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मद्यविक्री केंद्र बंद झालेले नाहीत.
सदर निवडणूक ५ जिल्ह्याची असून या काळात दुकाने बंद राहील्यास पाचही जिल्ह्यातील दारु विक्रेत्यांचे मोठे नुकसान होईल. त्याच बरोबर शासनाचा सुध्दा मोठय़ा प्रमाणात महसूल बुडेल तरी याबाबत निर्णय घेवून मद्यविक्री दुकान पुर्वरत सुरु करण्याचे आदेश देण्यात यावे, असे पाठविलेल्या निवेदनात बंडुसेठ राठोड यांनी नमुद केले आहे.

Web Title: Three days off alcohol sales