शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार एकरातील पिके पाण्याखाली

By admin | Updated: July 26, 2014 21:03 IST

शेतांमध्ये पाणी साचल्याने अंदाजे १000 एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात सरासरी १00 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बाश्रीटाकळी: गत दोन दिवसांत धो धो बरसणार्‍या पावसाने बाश्रीटाकळी तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरले असून, शेतांमध्ये पाणी साचल्याने अंदाजे १000 एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात सरासरी १00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गत दीड महिन्याचा अनुशेष भरून काढताना मंगळवार, २२ जुलैपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आभाळ फाटल्यासारखा बरसला. बुधवारीही रिपरिप थांबली नव्हती. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश सर्वच नदी-नाल्यांना छोटे-मोठे पूर आले. तालुक्यात कोठेही पूर परिस्थिती नसली तरी या दमदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे अनेक शेतांमध्ये दोन-दोन फूट पाणी साचल्याने या शेतांना तळय़ांचे रूप आले आहे. नवांकुरित खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. तालुक्यात बाश्रीटाकळी परिसरात ११५ मिमी, खेर्डा भागात ९५ मिमी, पिंजर १00 मिमी, धाबा ७७ मिमी, राजंदा ६५ मिमी, महान ९३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. कान्हेरी परिसरातील २00 एकरावरील पिके पाण्याखाली बुडाली आहेत. महान, धाबा, राजंदा, शिरखेड, सुकळी, राहित-साहित, खेर्डा, हातोला, टेंभी, निंभारा, तिवसा, पुनोती, पाटखेड, मांगुळ, मोरगा काकड, टाकळी छबिले या गावांतील अनेक शेतकर्‍यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. सदर पिके पाण्याखाली आणखी १0 ते १५ तास राहिल्यास ती सडण्याची दाट शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.