शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या घरासमोर ‘थाली बजाव’ आंदोलन

By admin | Updated: July 28, 2014 01:40 IST

अकोला शहरातील अतिक्रमणग्रस्त बेरोजगार कृती समितीचा सहभाग

अकोला : व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा द्यावी व महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना साहित्याची तोडफोड करून नये, या मागण्यांसाठी अतिक्रमणग्रस्त बेरोजगार कृती समितीने रविवारी खासदारांच्या घरासमोर ह्यथाली बजावह्ण आंदोलन केले. काही दिवसांपासून महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत रस्त्यालगत व्यवसाय करणार्‍या लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांची दुकाने हटविण्यात आली. पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने लघू व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लघू व्यावसायिकांनी यापूर्वी अनेक वेळा मनपा प्रशासनाशी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा केली. तसेच निवेदनही सादर केले. मात्र लघू व्यावसायिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. दरम्यान, अतिक्रमण मोहिमेत हटविण्यात आलेल्या व्यवसायिकांनी अतिक्रमणग्रस्त बेरोजगार कृती समितीची स्थापना केली. कृती समितीनेही प्रशासनाशी चर्चा केली. मात्र यश आले नाही. त्यामुळे समितीने लोकप्रतिनिधींकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास खा. संजय धोत्रे यांच्या घरासमोर कृती समितीने ह्यथाली बजावह्ण आंदोलन केले. सुमारे अर्धा तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संदीप जोशी, नंदू ढोरे, सतीश देशमुख, राजू कनोजिया, भूपेंद्र अंबुसकर, काशीनाथ बाभूळकर, शिवलाल इंगळे, संजय तायडे यांच्यासह कृती समितीचे अनेक कार्यर्ते उपस्थित होते.