दर्यापूर येथील मुलगी आढळली ‘स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह’

By Admin | Updated: February 26, 2015 01:30 IST2015-02-26T01:30:27+5:302015-02-26T01:30:27+5:30

अकोला जिल्हय़ात ८ रुग्णांची नोंद.

'Swine Flu Positive' found in Daryapur | दर्यापूर येथील मुलगी आढळली ‘स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह’

दर्यापूर येथील मुलगी आढळली ‘स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह’

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात दर्यापूर येथील एका मुलीला दाखल करण्यात आले असून, सदर मुलगी स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सवरेपचार रुग्णालयात आतापर्यंत स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असलेल्या ८ रुग्णांची नोंद करण्यात आली असून यामधील पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिघांना सुटी देण्यात आली आहे. ह्यस्वाइन फ्लूह्णमुळे राज्यातील ६0 हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. सवरेपचार रुग्णालयातही ८ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करण्यात आले असून यामधील पाच जणांवर आणि स्वाइन फ्लू संशयित असलेल्या तब्बल ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात अकोला, वाशिम, बुलडाणा व अमरावती, दर्यापूर आणि जळगाव जामोद येथील रुग्ण उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये सुरेश सिंह, अरुणा रामप्रकाश अवचार, मनोरमा संजय कावर, कमरुन्निसा शेख, गीताबाई पांडुरंग खडसान, सम्यक गौतम गवई व वीणा उमेश पवार व दर्यापूर येथील मुलीचा समावेश आहे. यामधील ३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, इतर पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल असलेल्या श्रावणी अशोक बायस्कर, रेशमा नीलेश राठोड, मनकर्णा शालीग्राम रोहणकार, ऋतिका किशोर धुरंधर, स्वप्निल यशवंत इंगळे, जयश्री हरीश वानखडे, योगिता सुनील राक्षसकर, यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या स्वाइन फ्लू संशयित ४४ रुग्णांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल बुधवारपर्यंत रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.

Web Title: 'Swine Flu Positive' found in Daryapur