शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अभियंत्यासह तिघे निलंबित

By admin | Updated: July 13, 2014 21:33 IST

कार्यालयात येऊन कागदपत्रांमध्ये खोडतोड करून आपल्या विरोधातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.

अकोला: महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागांतर्गत येणार्‍या बाश्रीटाकळी उपविभागाचे सहाय्यक अभियंता एम.ए. खांडरे यांच्यासह दोघाजणांविरोधातील तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांची बदली केली होती. मात्र, त्यांनी रविवारी कार्यालयात येऊन कागदपत्रांमध्ये खोडतोड करून आपल्या विरोधातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सहाय्यक अभियंता खांडरे यांच्यासह दुय्यम अभियंता व कनिष्ठ लिपिक यांना निलंबित केल्याची माहिती आहे. त्यांच्या विरोधात बाश्रीटाकळी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. बाश्रीटाकळी येथे नॉन डीडीएफ योजनेंतर्गत शेकडो कृषीपंप अनधिकृत असल्याचे आढळले होते. अनेक विद्युत खांबाची अनधिकृत उभारणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी केली. त्यानंतर अभियंता खांडरे, दुय्यम अभियंता नसीम खान व कनिष्ठ लिपिक विजय मानकर यांची बदली करण्यात आली होती. तसेच त्यांना कार्यमुक्तही करण्यात आले होते. त्यांची बदली झाल्यानंतरही त्यांनी रविवारी कार्यालयात येऊन कागदपत्रांमधील घोळ मिटवून आपल्या विरोधातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आली. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी अंती त्यांना मंगळवारी रात्री उशिरा निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ** मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता नॉन डीडीएफ कृषीपंप योजनेत बराच मोठा अपहार झाला असल्याची शक्यता आहे. केवळ एकटा अधिकारी हा अपहार करण्याची शक्यता नसून, यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. महावितरणकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तसेच दोषींवर कारवाईही करण्यात येणार आहे.