उन्हाळी वर्गाचा फज्जा; आयुक्तांची दिशाभूल

By Admin | Updated: June 19, 2014 21:58 IST2014-06-19T21:30:52+5:302014-06-19T21:58:06+5:30

किती शाळांमध्ये शिकवणी वर्गाचे आयोजन केले, याबद्दल ‘आळीमिळी..’ असताना अत्यंत उत्साहात उन्हाळी वर्गाचे आयोजन पार पडल्याचे सांगत शिक्षण विभागाने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली आहे.

Summer squares; Mismanagement of the Commissioner | उन्हाळी वर्गाचा फज्जा; आयुक्तांची दिशाभूल

उन्हाळी वर्गाचा फज्जा; आयुक्तांची दिशाभूल

अकोला : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शिक्षण विभागाला दिले होते. मे महिन्यात शिक्षण विभागाने नेमक्या कोणत्या कालावधीत व किती शाळांमध्ये शिकवणी वर्गाचे आयोजन केले, याबद्दल 'आळीमिळी..' असताना अत्यंत उत्साहात उन्हाळी वर्गाचे आयोजन पार पडल्याचे सांगत शिक्षण विभागाने स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली आहे. मनपा शाळेतील मराठी, उर्दू व हिंदी माध्यमाच्या ५५ शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, प्रशासकीय अधिकारी अनिल बिडवे यांना दिले होते. आयुक्तांच्या आदेशाची केवळ कागदोपत्री पूर्तता झाल्याचे समोर आले आहे. बोटावर मोजता येणार्‍या शाळांमध्ये उन्हाळी वर्गाचे आयोजन क रून फोटो काढण्यापुरते शिकवणी वर्ग घेण्यात आले. शिक्षण विभागाने मात्र भरगच्च कार्यक्रमांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व शिबिर, रेखीव हस्ताक्षर वर्ग, शुद्धलेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, शब्दकोडे, सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रकट वाचन, वैयक्तिक व सामूहिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परिसरातील माहिती, ऋतूंची माहिती, सामाजिकीकरण, प्रेरणादायी कथा, मनोरंजनात्मकखेळ, रंगांची व प्राण्यांची ओळख, वैयक्तीक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद होता.

Web Title: Summer squares; Mismanagement of the Commissioner