लोणार (बुलडाणा) : वाढते कर्ज आणि सततच्या नापिकीला कंटाळून लोणार तालुक्यातील खळेगाव येथे एका ५५ वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी देऊळगाव कोळ शिवारात घडली. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर खळेगाव येथील रघुनाथ शामराव इंगळे यांनी कर्ज काढून खरिपाची पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आले. रघुनाथ श्यामराव इंगळे यांच्यावर बँकेचे आणि खासगी सावकाराचे मिळून अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत कर्ज असून, सतत तीन वर्षापासूनच्या नापिकीमुळे कर्जाचा बोजा वाढतच गेला. यंदाही खरिपाची पेरणी करुन उत्पादनात फटका बसण्याची शक्यता असल्याने इंगळे चिंताग्रस्त झाले होते. या चिंतेतूनच त्यांनी देऊळगाव कोळ शिवारात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा आप्त परिवार आहे.
विषारी औषध प्राशन करुन शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST
लोणार तालुक्यातील घटना.
विषारी औषध प्राशन करुन शेतक-याची आत्महत्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}