भेंडी महाल येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST2020-12-04T04:50:51+5:302020-12-04T04:50:51+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर पिंजर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बुधवारी भेंडी (काजी) येथील एक ...

Suicide of a young farmer at Bhendi Mahal | भेंडी महाल येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

भेंडी महाल येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर पिंजर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बुधवारी भेंडी (काजी) येथील एक युवक शिवारात गुरे चारण्यासाठी गेला असता, त्याला दुर्गंधी येत असल्याने तो विहिरीत पाहण्यासाठी गेला असता त्याला मृतदेह आढळून आला. ओम बेलोरकार हा गत २२ दिवसांपासून घरून निघून गेला होता. बुधवारी भेंडी ( काजी) शिवारात भेंडगाव येथील आनंदराव भगत यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्याकडे शेती असून, कर्जाच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी रवाना केला असून, पुढील तपास ठाणेदार पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Suicide of a young farmer at Bhendi Mahal