शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पायगुण चांगला नसल्याचे टोमणे; नवविवाहितेने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 2:23 PM

तुझा पायगुण चांगला नाही, तू आमच्या घरात राहू नको, घटस्फ ोट घेऊन तुझ्या वडिलांच्या घरी जा’ अशा प्रकारचे टोमणे मारत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखोंडा माहेर असलेल्या एका युवतीचा विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळीने तिचा पायगुण योग्य नसल्याचा आरोप करीत वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याने या महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी तिच्या सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाखोंडा बु. येथील अरुण रामकृष्ण बोरेकर (५७) यांची मुलगी माधुरी हिचा विवाह सहा महिन्यांपूर्वी किरण रामेश्वर नारोडकर यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर १५ दिवसांनी माधुरी हिच्या सासºयाचा भीषण अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या मंडळीने सासºयाचे अपघाती निधनाचे कारण समोर करून तिला ‘तू अपशकुनी आहेस, तुझा पायगुण चांगला नाही, तू आमच्या घरात राहू नको, घटस्फ ोट घेऊन तुझ्या वडिलांच्या घरी जा’ अशा प्रकारचे टोमणे मारत होते. एवढेच नव्हे तर तिचा शारीरिक व मानसिक छळही सुरू केला होता. सासरच्या याच त्रासाला कंटाळून माधुरी किरण नारोडकर हिने १५ आॅक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आत्महत्या केली होती. या प्रकरणी १८ आॅक्टोबर रोजी अरुण बोरेकर यांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी आरोपी पती किरण रामेश्वर नारोडकर, रंजना रामेश्वर नारोडकर आणि सुवर्णा भागीनकार या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६, ४९८ अ, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या