शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, अन्यथा नोकरी धोक्यात!

By admin | Updated: November 19, 2014 02:07 IST

अकोला महापालिकेचा फतवा; कर्मचारी धास्तावले

आशिष गावंडे / अकोला

        महापालिकेच्या विविध विभागात वयाची ५५ वर्षे पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांवर गंडांतर आले आहे. या कर्मचार्‍यांना आता शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला देणे प्रशासनाने अनिवार्य केले असून, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करू न शकणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्याचा अप्रत्यक्ष फतवा उपायुक्तांनी जारी केल्याने कर्मचार्‍यारी धास्तावले आहेत. मनपाच्या आस्थापनेवरील ७४२ सफाई कर्मचार्‍यांच्या नियुक्तीत व नेमणुकीत घोळ असल्याची सबब पुढे करीत, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी सफाई कर्मचार्‍यांची हजेरी घेतली. अनेक सफाई कर्मचारी कामावर प्रत्यक्षात उपस्थित राहत नसल्याची परिस्थिती आहे. यावर तोडगा म्हणून प्रशासनाने मध्यंतरी सफाई कर्मचार्‍यांची प्रभागांतर्गत अदला-बदल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे साफसफाईची समस्या निकाली निघेल, ही अपेक्षा फोल ठरली. या कामासाठी उपायुक्त चिंचोलीकर यांनी मनपाची संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली होती. हाच कित्ता पुन्हा गिरवला जात आहे. महापालिकेच्या विविध विभागात वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिक आरोग्य चाचणी करून घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे संबंधित कर्मचार्‍यांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्र सादर न करू शकणार्‍या किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कर्मचार्‍यांना सेवेतूून कमी केले जाणार असल्याचा अप्रत्यक्ष फतवा प्रशासनाने जारी केल्याने कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.