आंतरराष्ट्रीय संशोधकांसोबत विद्यार्थ्यांचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:23+5:302021-02-15T04:17:23+5:30

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला बळ मिळावे तसेच फोनोटिक्स संबंधी ज्ञान व्हावे या उद्देशाने सदर वेबिनारचे आयोजन शाळेचे सचिव नितीन ...

Student interaction with international researchers | आंतरराष्ट्रीय संशोधकांसोबत विद्यार्थ्यांचा संवाद

आंतरराष्ट्रीय संशोधकांसोबत विद्यार्थ्यांचा संवाद

googlenewsNext

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला बळ मिळावे तसेच फोनोटिक्स संबंधी ज्ञान व्हावे या उद्देशाने सदर वेबिनारचे आयोजन शाळेचे सचिव नितीन झाडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. सदर वेबिनार मध्ये प्रीती जगदेव यांनी कॉम्प्युटर कोडिंग, फोनोटिक्स रिसर्च, तसेच तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन केले. मनातील न्यूनगंड बाजूला सारून विद्यार्थ्यांनी सदर बाबीला कसे सामोरे जावे, विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबत संशोधन वृत्ती कशी जोपासावी, संशोधन संदर्भ कसे गोळा करावे, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, स्वतःला तंत्रज्ञानाधारित कसे करावे या संबंधी स्वतःचे अनुभव सांगत मार्गदर्शन केले. सदर वेबिनारला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नाचे निरसन केले. यावेळी शाळेच्या प्राचार्यासोबत वर्ग ९ वी, १० वीचे विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Student interaction with international researchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.