शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय असंसर्गजन्य आजार शोधमोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 13:51 IST

जिल्हास्तरीय शोधमोहिमेचे उद्घाटन शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.

अकोला : कुठल्याही शासकीय योजनेचे किंवा मोहिमेचे यश हे सर्वसामान्यांच्या सहभागातूनच यशस्वी होतात. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य आजार शोधमोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य आजारांची विशेष शोधमोहीम राज्यभरात राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरीय शोधमोहिमेचे उद्घाटन शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्घाटकपदी आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, प्राथमिक आरोग्य केंद्र कापशीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण सरोदे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. एम. एम. राठोड यांनी केले. संचालन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले. आभार डाबेराव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप बाबर, डॉ. मेघा सावळे, डॉ. प्रशांत शिरसाट, जिल्हा आशा समन्वयक सचिन उनवणे, आरोग्य सेविका खेंडकर, आरोग्य सहायक प्रकाश नागे व संक्षय अकोटकर यांनी परिश्रम घेतले.२८ सप्टेंबरपर्यंत चालणार मोहीम

  • शुक्रवार, १३ सप्टेंबरपासून सुरू झालेली असंसर्गजन्य आजार शोधमोहीम २८ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येईल.
  • मोहिमेत आशा वर्कर्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
  • रुग्ण आढळल्यास त्यावर सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर ग्रामीण रुग्णालय व गरज पडल्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार केला जाणार आहे.

अशी असेल मोहीम

  • असंसर्गजन्य आजारांची अशी ठोस लक्षणे दिसून येत नाहीत.
  • यासाठी आरोग्य सेविका दहा प्रश्न विचारणार आहेत. व्यक्तीचे वय, वजन, पोटाचा घेर या गोष्टींची माहिती घेतली जाईल.
  • यावरून विविध आजारांच्या लक्षणांची पडताळणी केली जाईल.
  • त्यानुसार, तपासणीनंतर उपचारासाठी रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठविण्यात येईल.
  • ग्रामीण भागातील शंभर टक्के, तर शहरी भागातील ३० टक्के नागरिकांची तपासणी करण्यात येईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य