शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या दरातील धन्य वाटपाचा पेच कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 11:04 IST

राज्यातील ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात आहे.

- संतोष येलकर अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या राज्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्याचा निर्णय अडीच महिन्यांपूर्वी शासनाने घेतला; मात्र जिल्हास्तरावर अद्यापही धान्यसाठा उपलब्ध झाला नसल्याने, सवलतीच्या दरातील धान्य वाटपाचा पेच कायमच आहे. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत राज्यातील ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व इतर कोणत्याही योजनेत अन्नधान्याचा लाभ मिळत नसलेल्या राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ८ रुपये प्रतिकिलो गहू व १२ प्रतिकिलो तांदूळ याप्रमाणे सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात आले होते. याच धर्तीवर राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी घेण्यात आला तसेच केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी धान्याचे नियतनही मंजूर करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र मंजूर करण्यात आलेला धान्यसाठा अद्यापही राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे राज्यातील ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरातील धान्याचे वितरण अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने कोरोना काळात सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणार तरी केव्हा, यासंदर्भात राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.पुरवठा मंत्रालयाने मागितली धान्य वाटपाची माहिती!राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात वाटप करण्यात आलेले धान्य व शिल्लक असलेला धान्यसाठा यासंदर्भात जिल्हानिहाय माहिती शासनाच्या पुरवठा मंत्रालयाने २५ सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांकडून मागितली आहे.एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी धान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे; परंतु धान्यसाठा अध्याप उपलब्ध झाला नाही. धान्यसाठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात येईल.- बी.यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोला