शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

बस आणि ट्रकची जोरदार धडक, अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 3:46 PM

अपघातात बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

अकोला-अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेत बस चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्हातील बाळापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद फाट्याजवळ दुपारी एक वाजता  बाळापूरवरुन अकोलाकडे जाणाऱ्या एस.टी बस (क्रं. MH 40 AQ 61 6O )ची व अकोलावरुन बाळापुरकडे जाणाऱ्या कोळशाचा ट्रक (क्रं UP 7O GT O515)शी समोरा समोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर अचानक एसटीने आणि कोळशाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. यात ट्रक व एसटी बस जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं तर पोलिसांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

या घटनेत एसटी चालकाला गंभीर दुखापत झाली असून, सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत चालकाला अकोला येथील रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातानंतर बाळापूर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. बाळापूर पोलीसांनी वेळीच घटणास्थळ गाठून वाहतूक सुरळीत करतांनाच बसमधील प्रवाशांना उपचारा साठी दवाखाण्यात पाठविले. 

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोला