शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात सहा केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून हमी दराने होणार सोयाबीन खरेदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:16 IST

Akola : १२ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी; दैनंदिन 'मेसेज' नुसार होणार मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात सहा केंद्रांवर येत्या १५ नोव्हेंबरपासून हमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे. त्यासाठी सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेत १० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९५७सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

सततचा पाऊस आणि अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, जिल्ह्यात सरासरी एकरी एक ते तीन क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. प्रतिक्विंटल ५ हजार ३२८ रुपये सोयाबीन खरेदीचे दर असले तरी, त्या तुलनेत बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. त्यामुळे हमी दराने सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.

३० ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात

बाळापूर, पातूर व बार्शिटाकळी हे तीन खरेदी जिल्हा मार्केटींग अधिकारी आणि अकोला, अकोट व मूर्तिजापूर हे तीन खरेदी केंद्रे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरु करण्यात येणार असून, या केंद्रांवर हमी दराने सोयाबीन खरेदीचे नियोजन करण्यात आहे. हमी दराने सोयाबीन खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९५७ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Procurement at Support Price to Start in Akola on Nov 15

Web Summary : Akola will begin soybean procurement at six centers from November 15. Over 11,957 farmers have registered due to crop damage from heavy rains. Despite the support price of ₹5,328/quintal, farmers demand immediate procurement centers amid low market rates.
टॅग्स :FarmerशेतकरीSoybeanसोयाबीनfarmingशेतीAkolaअकोला