शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पेरणी उलटली!

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

अकोला जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे संकट.

अकोला : जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील महाबीज व इतर खासगी कंपन्यांचे पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारीचा ओघ वाढला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
यावर्षी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊ स झाल्यानंतर शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. आजमितीस जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर शे तकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. १५ व २३ जुलै रोजी पडलेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणीचा वेग वाढवल्याने गुरुवारपर्यंत ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. हा पाऊस सोयाबीन पिकाला पोषक ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, पोषक ठरण्याऐवजी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही.
गेल्यावर्षी अतवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर यावर्षी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
यात सर्वाधिक महाबीजच्या बियाण्यांचा समावेश असून, खासगी कंपन्यांचे बियाणे काही ठिकाणी उगवले नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. अकोला तालुक्यात कौलखेड जहागीर, रामगाव, खडकी, बोंदरखेड, चांचोडी आदी अनेक गावच्या शेतकर्‍यांचे सोयाबीन उगवले नाही. या संदर्भात कौलखेड व रामगावच्या शे तकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत.
गेल्या वर्षी झालेली अतवृष्टी आणि त्यानंतर रब्बी हंगामात गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना यावर्षीच्या खरीप पेरणीत पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे पेरल्यानंतर उगवले नसल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून, शे तकर्‍यांना पेरणीकरिता सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी कौलखेड जहागीर व रामगाव येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असता आणि आणेवारी पन्नास टक् क्यांपेक्षा कमी असताना विमा कंपनीकडून संबंधित शेतकर्‍यांना पीक विम्याची र क्कम दिली नाही. याबाबत चौकशी करून शेतकर्‍यांना तातडीने विम्याची रक्कम देण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून प्राप्त झाल्याचे महाबीज येथील जिल्हा व्यवस्थापक अरुण कलोरे नमूद करून ७0 ते ८0 बियाणे गोण्याचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात बियाणे तक्रार निवारण समिती शेतावर भेटी देत असून, महाबीजची समितीसुद्धा तपासणी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.