शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारंजाचा तुषार ठरला 'गणलक्ष्मी करंडक' चा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

अकोला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर- अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

अकोला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर- अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा शनिवारी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडली.

या स्पर्धेत कारंजाचा तुषार काकड हा गणलक्ष्मी करंडकचा मानकरी ठरला.

कारंजाचा तुषार काकड याला ' गणलक्ष्मी करंडक ' व रंगकर्मी विशाल डीक्कर स्मृती प्रीत्यर्थ रु. ५५५५/- रोख तर साहेबराव देशमुख स्मृतिप्रीत्यर्थ रु. ३३३३/- ( स्मृतिचिन्ह ) द्वितीय पुरस्कार ठाण्याचा सिध्देश शिंदे यास तर वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ तृतीय पुरस्कार व स्मृतिचिन्ह अमरावतीची प्राची ढोके हिला प्रदान करण्यात आला. आप्पासाहेब काटे स्मृतिप्रीत्यर्थ रु . ११११/- रोख चतुर्थ पुरस्कार वाशीमचा अनिल खोलगडे तर नरबदाबाई काटे स्मृतिप्रीत्यर्थ रु. ११११/- रोख पाचवा पुरस्कार वर्ध्याची रसिका मुळे हिला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी रोख रु. ५०१/- असे उत्तेजनार्थ पांच पुरस्कार - १) मयूर भालतिलक , अकोला २) ऋषिप्रकाश रत्नपारखी , खामगाव ३) मोनाली खुरकुटे , बुलडाणा ४) नंदिनी देशमुख , अकोला ५) केतकी क्षीरसागर , अकोला, तर अरुण घाटोळे पुरस्कृत ' श्याम - कमल ' लक्षवेधी पुरस्कार रु. ५०१ /- अमरावतीच्या सौरव अढाऊ याला प्रदान करण्यात आला. पारितोषिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे होते ,तर सिने कलावंत व माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हरीश इथापे ( वर्धा ) , सुरेश बारसे (अमरावती) , व अरुण घाटोळे ( अकोला ) ही परीक्षकत्रयी तथा स्पर्धा संयोजक व शाखा अध्यक्ष प्रा. मधू जाधव , कार्याध्यक्ष डॉ गजानन नारे , कार्यवाह अशोक ढेरे आदी मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रा. मधू जाधव यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन स्नेहल कहाळे हिने केले. आयोजनात सचिन गिरी , संजय पाटील , प्रशांत गावंडे यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते.