शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांकडून मनपाच्या हातावर तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:50 IST

अकोला: मुख्य रस्त्यांवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा महापालिकेचा प्रयोग सपशेल फसला.

अकोला: मुख्य रस्त्यांवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा महापालिकेचा प्रयोग सपशेल फसला. लघू व्यावसायिक व फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला चर्चेत झुलवत ठेवून प्रशासनाच्या हातावर तुरी टेकवल्याचे चित्र समोर आले आहे. गणेश घाटावर दुकान थाटण्यास फेरीवाल्यांनी पाठ फिरवली असून, पुन्हा एकदा मुख्य रस्त्यांवरच ठिय्या मांडला आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस काय निर्णय घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. मनपाच्या अतिक्र मण निर्मूलन पथकाचा धाक नसल्यामुळे फेरीवाले चक्क मुख्य रस्त्यांवर बाजार मांडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड ड्रेस विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फळ विके्रत्यांचा समावेश आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ गांधी रोड, टिळक रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर स्थिरावली आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावर धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी फेरीवाले व लघू व्यावसायिकांना मोर्णा नदीच्या काठावरील मुख्य गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमकांची नेमकी संख्या निश्चित करण्यात आली. तसेच लघू व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत वारंवार सकारात्मक चर्चा केली. संघटनेच्या पदाधिकाºयांनीसुद्धा गणेश घाटावर जाणार असल्याचा विश्वास दर्शविला. सहा दिवस उलटून गेल्यानंतरही एकाही फेरीवाल्याने गणेश घाटावर दुकान थाटले नसल्याचे चित्र समोर आले आहे.या ठिकाणी बाराही महिने अतिक्रमणशहरातील मुख्य रस्त्यांवर थाटल्या जाणाºया अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने गांधी चौक, गांधी रोड चौपाटी, मनपाची आवारभिंत, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज परिसर, मोहम्मद अली मार्ग, ताजनापेठ चौक, टॉवर चौक , धिंग्रा चौकाचा समावेश आहे.

नियोजनाची केली ऐशीतैशीशासनाने मनपाच्या स्तरावर फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप विकसित केले. सदर अ‍ॅपच्या माध्यमातून फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. मनपाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून ठाणे येथील एजन्सीने सर्वेक्षण केले असता शहरातील फेरीवाल्यांची संख्या १,६०० पेक्षा अधिक होणार असल्याची माहिती आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांना झोननिहाय जागांचे वाटप करण्यासाठी मनपाने नियोजन केले होते. या नियोजनाची फेरीवाले व लघू व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐशीतैशी केल्याचे समोर आले.

रेडीमेड ड्रेस विक्रेता, कटलरी व खाद्यपदार्थांची विक्री करणाºयांना एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात संबंधित संघटनांच्या पदाधिकाºयांसोबत सातत्याने चर्चा केली. यापुढे अतिक्रमकांनी रस्त्यावर बाजार मांडल्यास कोणतीही हयगय न करता साहित्य जप्त करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले आहेत.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका