शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भाला लागणार सहा लाख मेट्रिक टन खतांचा साठा

By admin | Updated: May 5, 2015 00:05 IST

कृषी विभागाने केले नियोजन; डीएपीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता.

अकोला : येत्या खरीप हंगामात पश्‍चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टर क्षेत्रासाठी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा लागणार असून, कृषी विभागाने यासाठीचे नियोजन केले आहे. पण, दरवर्षी कमतरता भासणार्‍या डीएपी खताचा साठा यावर्षी ९७,८00 एवढाच असल्याने या खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पश्‍चिम विदर्भात सर्वाधिक १४ लाख ९२ हजार ९0१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाणार आहे. त्यानंतर कापसाचे पीक हे ९ लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाणार आहे. उर्वरित इतर तृण, गळीत व डाळवर्गीय पिकांचा समावेश आहे. या सर्व पिकांसाठी यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन रासायनिक खत लागणार आहे. या करिता कृषी विभागाने मागणी नोंदवली आहे. यामध्ये युरिया २ लाख १८ हजार ९00 मेट्रिक टन, एमओपी ३४ हजार ५00 मेट्रिक टन, एसएसपी १ लाख ११ हजार १00 मेट्रिक टन, एएस ५,४00 मेट्रिक टन, १0:२६:२६ हे खत ५,१00 मेट्रिक टन, १२:३२:१६ या खताची ४,४00 मेट्रिक टन, १४:३५:१४ हे खत १५,८00 मेट्रिक टन लागणार आहे. १४:२८:१४ या खताच्या ७,३00 मेट्रिक टन साठय़ाची गरज आहे. १५:१५:१५ हे खत ११,९00 मेट्रिकटन लागणार आहे, तर १६:१६:१६ या खताचा साठा १0,७00 मेट्रिक टन लागणार आहे. १६:२0:0 :१३ हे खत २ हजार १00 मेट्रिक टन लागणार आहे. १९:१९:१९ हे खत १,४00 मेट्रिक टन लागणार आहे. २0:२0:00 या खताची ५९,२00 मेट्रिक टनाची नोंदणी करण्यात आली आहे. २४:२४:00 हे खत ५,६00 मेट्रिक टन लागणार आहे. अकोला जिल्हय़ासाठी डीएपी १२,९00 मेट्रिक टन, तर युरिया १९,८00 मेट्रिक टन लागणार आहे. इतर सर्व खते मिळून या जिल्हय़ासाठी ७२,४00 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हय़ाला युरिया ६२,८00 तर डीएपी २७,१00 मेट्रिक टनासह इतर सर्व खते मिळून १,८३ ७00 मेट्रिक टन लागणार आहे. वाशिम जिल्हय़ासाठी युरिया १८,२00, डीएपी ११,६00 मे.ट. तर उर्वरित खते मिळून ६0,६00 मेट्रिक टन रासायनिक खते लागणार आहेत. अमरावती जिल्हय़ाला सर्व खते १,१५,६00 मेट्रिक टन, तर यवतमाळ जिल्हय़ासाठी २,३,९00 मेट्रिक खताचा साठा लागणार आहे. या सर्व खतांची नोंदणी कृषी विभागाने केली आहे. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामासाठी खताची मागणी केली असून, हे खत शेतकर्‍यांना उपलब्ध होईल. त्यामुळे खतांची टंचाई भासणार नसल्याचे अमरावती येथील विभागीय कृषी सह संचालक एस.आर.सरदार यांनी सांगीतले.