शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
3
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
6
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
7
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
8
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
9
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
10
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
11
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
12
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
13
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
14
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
15
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
16
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
17
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
18
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
19
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
20
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीकडून भावाची फसवणूक

By admin | Updated: June 6, 2014 01:18 IST

नुकसान भरपाईची रक्कम हडप करणार्‍या बहिणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

अकोला - दगडपारवा येथील धरणामध्ये गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईची रक्कम हडप करणार्‍या बहिणीविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सदर जमिनीला ती एकमेव वारस असल्याचे शपथपत्र देऊन ही रक्कम हडपल्याचे समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील शाहपूर खुर्द येथील रहिवासी झुगला चव्हाण यांची बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा शेतशिवारात ०.७८ हेक्टर शेतजमीन होती. दगडपारवा धरणाच्या निर्माणावेळी ही जमीन ताब्यात घेण्यात आली होती. या मोबदल्यात जिल्हा प्रशासनाद्वारे त्यांना रक्कमही देण्यात आली; मात्र या रकमेवर ती संतुष्ट नसल्याने मोबदल्याची रक्कम वाढविण्यासाठी झुगला चव्हाण यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दरम्यान झुगला चव्हाण यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यानंतर झुगला यांची मुलगी सुशील मोहन राठोड (मंगरुळपीर) हिने न्यायालयात याचिकेवर एक शपथपत्र सादर केले. शपथपत्रात तिने दावा केला की, झुगला चव्हाण यांची ती एकमेव वारस असून, सदर प्रकरण पुढे सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर सदर प्रकरणाची २०१३ मध्ये सुनावणी होऊन सुशीला राठोड यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. सुशीला राठोड यांना शेतजमिनीचा पूर्ण मोबदलाही मिळाला. मात्र, त्यानंतर सुशीला राठोडचा सख्खा भाऊ सेवानिवृत्त कर्मचारी साहेबराव मुंगराम चव्हाण याला माहिती मिळाली की, जमिनीच्या मोबदल्याची रक्कम बहिणीने एकटीनेच हडप केली. यावर साहेबराव चव्हाण यांनी सुशीला राठोड यांनी न्यायालयात सादर केलेला प्रतिज्ञालेख आणि इतर दस्तऐवज गोळा करून तिच्याविरुद्ध १८ एप्रिल रोजी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस.बी. काळे यांच्या न्यायालयात झाली असून, यामध्ये सर्व दस्तऐवज तपासल्यानंतर सदर प्रकरणात सुशीला राठोड हिने तिचा सख्खा भाऊ साहेबराव चव्हाण यांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर न्यायाधीश एस. काळे यांच्या न्यायालयाने सुशीला मोहन राठोड हिच्याविरु द्ध कलम ४०९,४१५,४१७, ४१८, ४२०, ४६८, ४७१ आणि १९९ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी राठोड हिच्याविरुद्ध सदर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.