शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवभक्तांनी केला तपेश्‍वरीला जलाभिषेक

By admin | Updated: August 19, 2014 01:08 IST

चौथ्या सोमवारी शेकडो शिवभक्तांनी पूर्णेचे पाणी कावडीने आणून ‘हर हर महादेव’च्या गजरात भवानीपुरा येथील तपेश्‍वरी मंदिरामध्ये महादेवाला जलाभिषेक केला.

आकोट : श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी शेकडो शिवभक्तांनी पूर्णेचे पाणी कावडीने आणून 'हर हर महादेव'च्या गजरात भवानीपुरा येथील तपेश्‍वरी मंदिरामध्ये महादेवाला जलाभिषेक केला. सकाळपासून अकोला नाका येथून कावडयात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. शहारात ठिकठिकाणी या कावड यात्रेचे भाविकांनी स्वागत करून पूजन केले. कावड यात्रा उत्सवामधील भक्तिमय वातावरणाने आकोटनगरी दुमदुमली होती. रविवारला रात्री गेलेले शिवभक्त मंडळ गांधीग्राम येथून कावडीने पाणी घेऊन आकोटात दाखल झाले. शहरातील प्रमुख मार्गाने वाजतगाजत कावड यात्रा व शिवपालखी निघाली. शिवभक्तांनी शहरातील तळोकारपुरा भागातील तपेश्‍वरीला तर काही शिवभक्तांनी शहरातील नंदीपेठेतील नंदिकेश्‍वराला जलाभिषेक केला. कावडयात्रेत विविध प्रकारचे आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. काही मंडळांनी महादेवाची वेशभूषा करून शोभायात्रेचे आकर्षण वाढविले होते. विविध मंडळांनी आरोग्यविषयक तसेच एकतेचा संदेश देणारे फलक लावले होते. या कावडयात्रेत शिवभक्त मंडळ गणेश मंदिर आकोट, श्री पंचमुखी शिव भक्त मंडळ यात्राचौक, शिवभक्त मंडळ शनवारा ग्रुप, तपेश्‍वरी शिवभक्त मंडळ आकोट, नाथूबाबा ग्रुप आकोट, जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळ रामटेकपुरा, श्रीराम व्यायामशाळा मोठे बारगण, हिंद नवयुवक मंडळ यात्रा चौक, जयशक्ती शिवशक्ती व्यायामशाळा दखनी फैल, नंदिकेश्‍वर व्यायाम शाळा नंदिपेठ, क्रांती ग्रुप महात्मा फुले चौक, भयानक क्रांती ग्रुप, वीर संग्राम मंडळ, सिंधू नवजवान शिवभक्त मंडळ, जय महाकाल शिवभक्त मंडळ, गणपती मंदिर कावड मंडळ, छावा शिवभक्त मंडळ, जय ग्वाला शिवभक्त मंडळ, मातंग समाज शिवभक्त मंडळ आदी एकूण २१ मंडळांनी शोभायात्रेत सहभाग घेतला होता. मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी, महिला मंडळीने कावडयात्रेचे पूजन केले. मिरवणुकीच्या मार्गावर शिवभक्तांसाठी विविध संघटनांनी चहा, पाणी, फराळ, फळ, बासुंदी आदीची व्यवस्था केली होती. पालखी मिरवणूक पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडली.