शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी!

By admin | Updated: June 16, 2017 00:54 IST

महामार्ग निर्मितीत अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांची ग्वाही!

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : महामार्ग निर्मितीत अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन शेगाव येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी अकोल्याहून शेगावकडे कारने जाणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पारस फाट्यावरील एका हॉटेलमध्ये राष्ट्रीय महामार्ग निर्मितीत अन्याय झालेल्या शेतकऱ्याशी बोलताना दिले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पारस फाट्यावरील एका हॉटेलसमोर बााळापूर तालुक्यातील महामार्ग निर्मितीत भूसंपादनात अन्याय झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यास जाताना ठाकरे यांचा ताफा शेतकऱ्यानी अडविला होता. त्यावेळी त्यांनी शेतकरी नेते अ‍ॅड. मुरलीधर राऊत, आकाश दांदळे, संजय शेळके, राजू हिवरकर, लक्ष्मीनारायण श्रीमाळी, वाजीद इमरान, संतोष बिलबिले, मो. अबरार मो. मसुद आदींनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी बाळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील मोबदल्याबाबत शेतकऱ्यांवर झालेला अन्यायाचा पाढा वाचून त्यांना न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले. यावेळी उपरोक्त शेतकरी नेत्यांनी बाळापूर तालुक्यात भूसंपादनात गेलेल्या शेतीची माती व कापूस ठाकरे यांना सदिच्छा भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी करणारे निवेदन दिले.यावेळी उद्धव ठाकरे यांनी या मातीचे इमान घेऊन सांगतो, की कर्जमुक्तीसोबतच मी महामार्ग निर्मितीमध्ये अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे सर्व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. यावेळी बाळापूर तालूका शिवसेनेच्या वतीने ढोलताशे व फटाके वाजवून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच ठाकरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी उपस्थित होते.