शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पिंजरा तोडून वाघाने केल्या सत्तर कोंबड्या फस्त

By admin | Updated: March 10, 2015 01:48 IST

मालेगाव तालुक्यातील रेगावात वाघाची दहशत; वनविभागाने केला पंचनामा.

मालेगाव (वाशिम): तालुक्यातील रेगाव येथील एका शेतकर्‍याच्या शेतातील सुमारे ७0 कोंबड्या वाघाने फस्त केल्याची घटना ६ मार्च रोजी घडली. रविवारी वनविभागाने केलेल्या पंचनाम्यात वाघाचे ठसे व केस आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रेगाव येथे किशोर कांबळे व ज्ञानदेव लठाड यांनी कृषी समृध्दी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकी ५0 कोंबड्यासाठी पिंजरा केला होता. यामध्ये १00 कोंबड्या ठेवण्यात येत होत्या. ६ मार्च रोजी वाघ शेतामध्ये आला. त्याने या कोंबड्याचा पिंजरा तोडण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न केला. पिंर्ज‍याची एक बाजू तोडल्यानंतर वाघाने पिंजर्‍यातील ७0 कोंबडया फस्त केल्या. वाघाच्या डरकाळीने जागलीवर असलेले शेतातील शेतकरी जीव मुठीत घेवून लपून बसले होते. कोंबड्यावर ताव मारल्यानंतर वाघ निघून गेला. यानंतर पहाटे काही शेतकर्‍यांनी कांबळे यांच्या शेतात धाव घेतली. त्यावेळी त्यांना सर्वत्र कोंबड्यांचे अवशेष दिसून आले. या घटनेची माहिती सी.एम.आर.सी.व्यवस्थापक शरद कांबळे यांनी वनपाल मेश्राम यांना दिली. त्यानंतर वनपाल मेश्राम यांनी वनरक्षक शिंदे यांना घटनास्थळी पाठवून चौकशी केली. मात्र, त्यानंतर पुढील कारवाई झाली नसल्याने रेंजर खोपडे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती ८ मार्च रोजी देण्यात आली. रेंजर खोपडे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.