शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यात जलयुक्तच्या कामांसाठी १६ गावांची निवड

By admin | Updated: May 9, 2017 19:46 IST

जलसिंचनात मोठय़ा प्रमाणात वाढ व्हावी म्हणून तालुक्यात मागील वर्षी जलयुक्तची मोठय़ा प्रमाणात कामे झाली.

सन २0१६-१७ ची ४१ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावरतेल्हारा : जलसिंचनात मोठय़ा प्रमाणात वाढ व्हावी म्हणून तालुक्यात मागील वर्षी जलयुक्तची मोठय़ा प्रमाणात कामे झाली. सन २0१६-१७ ची ४१ कामे तालुक्यात चालू असून, सन २0१७-१८ करिता १६ गावांची निवड करण्यात आली. राज्य शासन प्रत्येक गावात पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून कृ षी विभाग, जलसंधारण उपविभाग अकोट, लघुसिंचन विभागामार्फत तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात मंजूर झाली होती. यामध्ये सन २0१५-१६ मध्ये तालुक्यातील ३८ गावांची निवड होऊन ७५१ कामे मंजूर होऊन त्यामधील ६८0 कामे पूर्ण झाली होती. उर्वरित ७१ कामे सन २0१६-१७ मध्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये खोलीकरण करणे, गाळ काढणे व बंधार्‍यांची कामे आहेत. सन २0१७-१८ मध्ये तालुक्यातील १६ गावांचीच सदर कामांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये सांगवी, खापरखेडा, अटकळी, खेलसटवाजी, खेलदेशपांडे, तळेगाव बु., मालठाणा बु., मालपुरा, पिवंदळ बु., शिवाजी नगर, उकळी बु., तुदगाव, तळेगाव पातुर्डा व अन्य गावांची निवड करण्यात येऊन सदर गावात शिवारफेरी काढून १५ मेपर्यंत आराखडे सादर करायची आहेत. तसा सर्व्हे कृ षी विभागाकडून चालू असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत जलयुक्तच्या कामासाठी तब्बल २२ गावांची निवड करण्यात आली. शासनाने जलयुक्तच्या कामासाठी अजूनही इतर गावांची निवड केल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसिंचनामध्ये वाढ होईल. मागील तीन वर्षांमध्ये झालेल्या कामांमुळे बर्‍याच गावांतील पाण्याची पातळी वाढलेली दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)राज्य शासन पाण्याची पातळी वाढावी म्हणून जलयुक्त शिवाराची कामे मोठय़ा प्रमाणात करीत असले, तरी तालुक्यात होत असलेल्या कामांना कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट देऊन पाहणी केल्याचे ऐकिवात नाही, त्यामुळेच कमी गावांची निवड करण्यात आली.सन २0१७-१८ मध्ये जलयुक्तच्या कामासाठी १६ गावांची निवड करण्यात येऊन १५ मेपर्यंत शिवारफेरी काढून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविले जातील.- सागर इंगोले,तालुका कृ षी अधिकारी, तेल्हारा.