शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरजवळील बेकायदेशीर औषधांचा साठा जप्त!

By admin | Updated: December 9, 2014 00:40 IST

अन्न व औषध प्रशासनाची रिधोरा येथे कारवाई

सचिन राऊत /अकोलारिधोरा येथील एका डॉक्टरकडे असलेला बेकायदेशीर औषधांचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी रात्री जप्त केला. डॉक्टरांना औषध विक्री करण्याचे अधिकार नसतानाही या डॉक्टरने औषध विक्री सुरू केली होती; मात्र प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी डॉक्टरच्या या औषध विक्रीचा सोमवारी रात्री पर्दाफाश केला. सदर डॉक्टरची डिग्री तपासण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.औषध विक्री करताना परवानाधारक औषध दुकान व फार्मासिस्टच्या उपस्थितीतच औषध विक्री करण्याचा नियम आहे. चुकीचे औषध दिल्यास एखाद्या रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि हे प्रकार घडल्यामुळे औषध विक्रीसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र रिधोरा येथील डॉ. प्रवीण चोपडे यांनी नियमांना पायदळी तुडवीत आपल्या घरातूनच अँलोपॅथी औषधांचे विक्री सुरू केली होती. या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी रात्री डॉ. चोपडे यांच्या रिधोरा येथील रुग्णालयात व घरी छापा मारून सुमारे १0 हजार रुपयांचा अँलोपॅथी औषधांचा साठा जप्त केला. रुग्णालयात प्रीस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतर डॉक्टरच्या घरी एका महिलेकडून सदर औषधे देण्यात येत असल्याचेही यावेळी समोर आले. या गंभीर प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी दखल घेत डॉ. प्रवीण चोपडे यांचे रुग्णालय व घरातील औषधसाठा सीलबंद केला आहे. सदर औषधांचे देयक सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, देयक सादर केल्यानंतर आणि डिग्री तपासणी झाल्यावर सदर डॉक्टरवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एच. वाय. मेतकर, एम.एस. चौधरी, एस.एम. राठोड, जे. एम. झोपे व उमेश देशमुख यांनी केली. या कारवाईमुळे ग्रामीण भागात बेकायदेशीरित्या सुरु असलेल्या औषध विक्रीच्या व्यवहारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.