शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विकणार्‍या कंपन्यांना जिल्हाबंदी करा!

By admin | Updated: August 5, 2014 01:05 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची शासनाकडे शिफारस

अकोला- खरीप हंगामामध्ये पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे जिल्ह्यातील १५0 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकर्‍यांना अशाप्रकारे अडचणीत आणणार्‍या कंपन्यांना जिल्हय़ात बियाणे विक्री करण्यास प्रतिबंध करावा, अशी शिफारस करणारा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी घेण्यात आला. जिल्हा परिषद सभागृहात दुपारी २ वाजता आयोजित स्थायी समिती सभेत शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी बोगस बियाण्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. उगवणशक्ती नसलेले बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांमुळे जिल्हय़ातील शेतकरी नागवला जात आहे. अशा कंपन्यांच्याविरोधात शेतकर्‍यांना ग्राहक मंचशिवाय दुसरा पर्याय नसतो. आधीच आर्थिक संकटात सापडलेला अल्पभूधारक शेतकरी बोगस बियाणे निघाल्यानंतर कंपन्यांच्याविरोधात कायदेशीर लढाईसुद्धा लढू शकत नाही. त्यामुळे अशा कंपन्यांना काळ्य़ा यादीत टाकून जिल्ह्यात बियाणे विक्री करण्यास बंदी करण्यात यावी, अशी शिफारस करणारा ठराव स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. हा ठराव पांडे गुरुजी यांनी मांडल्यानंतर त्याला भारिप-बमसंचे गटनेते विजय लव्हाळे यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले. यासभेला अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, कृषी सभापती रामदास मालवे, समाजकल्याण व महिला बालकल्याण सभापती आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)