शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लेमलेस किचन’ ठरतोय शाळांसाठी सुरक्षित पर्याय

By admin | Updated: August 20, 2016 02:34 IST

अकोल्यातील पहिला प्रयोग प्रभात किड्स शाळेत; फ्लेमलेस किचनमुळे इंधनाचीही बचत होते.

अतुल जयस्वालअकोला, दि. १९ : स्वयंपाकघर व त्यातही शेकडो जणांचे अन्न शिजविले जाते असे स्वयंपाकघर म्हटले की, गॅसवर चालणार्‍या मोठमोठय़ा भट्टय़ा, प्रचंड उष्णतेमुळे घामाघूम झालेले आचारी व कामगार वर्ग असे चित्र डोळय़ासमोर उभे राहते. शिवाय आगीचा संबंध येत असल्यामुळे शाळेतील अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावर फ्लेमलेस किचन अतिशय उपयुक्त ठरत असून, अकोल्यातील पहिला प्रयोग प्रभात किड्स शाळेत करण्यात आला आहे. यामुळे शाळा अधिक सुरक्षित झाली आहे.अकोला-पातूर रोडवर शहरापासून काही अंतरावर प्रभात किड्स ही शाळा असून, या शाळेत जवळपास १८00 विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय शाळेतच करण्यात आली असून, दररोज १५00 विद्यार्थ्यांंचे जेवण शाळेत तयार केले जाते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जेवण बनविण्यासाठी शाळेतील स्वयंपाकगृहात पूर्वी गॅसवर चालणार्‍या मोठमोठय़ा भट्टय़ा होत्या. यामुळे दररोज मोठय़ा प्रमाणात सिलिंडर लागत होते. तसेच गॅसचा कितीही काटेकोरपणे वापर केला, तरी थोडे दुर्लक्षही मोठय़ा अपघातास कारणीभूत ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाने सिलिकॉन ग्रीन सिंथेटिक फ्लुइड तंत्रज्ञानावर आधारित संयंत्र स्वयंपाकगृहात बसवून घेतले. हे संयंत्र बसविलेल्या स्वयंपाकगृहात आगीचा प्रत्यक्ष संबंध येत नसल्यामुळे सुरक्षितता वाढली आहे.असे आहे फ्लेमलेस किचनफ्लेमलेस किचन हे मुख्यत्वे दोन भागात विभागलेले आहे. पहिला भाग म्हणजे थर्मिक फ्लुइड हिटर व दुसरा भाग म्हणजे स्वयंपाकगृहातील स्टेनलेस स्टीलची विशाल भांडी. थर्मिक फ्लुइड हिटरमध्ये लाकूड किंवा व्हाइट कोल किंवा वुडन ब्लॉक टाकून पेटविले जाते. या हिटरमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेने दुसर्‍या टँकमधील ऑईल गरम होऊन ते पाइपलाइनद्वारे स्वयंपाकगृहातील स्टेनलेस स्टिलच्या भट्टीवजा भांड्यांपर्यंत जाते. या भांड्यांखाली उष्णता निर्माण होऊन भांडे गरम होते. या किचनमध्ये तीन मोठय़ा कढई व पोळय़ा भाजण्यासाठी तीन मोठे तावे आहेत. प्रत्येक भांड्याला स्वतंत्र नॉब आहे. या संयंत्राचे तापमान १00 अंश ते २५0 अंश सेल्सिअसपर्यंंत वाढविल्या जाऊ शकते. या गरम झालेल्या भांड्यांमध्ये भाजी, वरण, भात यासारखे पदार्थ बनविता येतात. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात स्वयंपाक तयार करता येत असल्यामुळे वेळ व इंधनाची बचत तसेच सुरक्षितता असा दुहेरी उद्देश या ह्यफ्लेमलेसह्ण किचनद्वारे साधल्या गेल्याचे शाळेचे संचालक नीरज आवंडेकर यांनी सांगितले.