शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री

By admin | Updated: April 2, 2015 01:59 IST

‘वेटिंग’मुळे तिकीट वा प्रवास रद्द करण्याचे प्रमाण होणार कमी.

अकोला : भारतीय रेल्वे प्रशासनाने तिकीट आरक्षणाचा अवधी ६0 दिवसांवरून १२0 दिवसांवर नेण्याचा निर्णय ३१ मार्च रोजी घेतला. ही योजना १ एप्रिलपासून देशभरात एकाच वेळी कार्यान्वित झाली. यापुढे रेल्वेने प्रवासाचे बेत आखणार्‍या प्रवाशांना चार महिने अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. तर योजना कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अकोला रेल्वे स्थानकावर ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री झाल्याची माहिती आहे.पूर्वीच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे जाळे देशात सर्वदूर पसरले आहे. पूर्वी एका ठिकाणाहून दुसर्‍या दूरच्या ठिकाणी जाताना प्रवाशांना अनेक ठिकाणी गाड्या बदलाव्या लागत होत्या. पूर्वीच्या सर्व अडचणींवर मात करीत उदयास आलेल्या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीमुळे देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या रेल्वे मार्गातील हे सर्व अडथळे दूर झाले. अद्ययावत सेवा-सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वे प्रशासन विविध बदल करीत आहेत. प्रवासाचे बेत आखणार्‍या प्रवाशांना पूर्वी ६0 दिवस अर्थात दोन महिने अगोदर रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येत होते. प्रवासाच्या दिवसापर्यंंत तिकीट कन्फर्म होण्यासाठी वाट पाहणार्‍या प्रवाशांना ह्यवेटिंगह्णमुळे एक तर अडचणीचा ठरणारा प्रवास करावा लागत होता, नाही तर तिकीट रद्द करून प्रवासाचे बेत बदलावे लागत होते. त्यातच मध्यंतरीच्या काळात तिकीट कन्फर्म नसलेल्या प्रवाशांना आरक्षित डब्यात प्रवास करता येणार नाही, असा फतवादेखील रेल्वे प्रशासनाने काढला. यामुळे पूर्णत: अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सरसकट १२0 दिवस अगोदर म्हणजे तब्बल चार महिन्यांपूर्वी रेल्वे तिकिटाचे आरक्षण करण्याची योजना १ एप्रिलपासून प्रवाशांसाठी संपूर्ण देशभरात एकाच वेळी कार्यान्वित केली. यामुळे आरक्षण तिकीट ह्यवेटिंगह्णवर असलेल्या बहुतांश प्रवाशांवर तिकीट वा प्रवास यापैकी काहीही रद्द करण्याची वेळ येणार नाही.