शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आकोट तालुक्यात नदी-नाल्यांना पूर

By admin | Updated: September 8, 2014 00:05 IST

आकोट तालुक्यात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस; आकोट-हिवरखेडमार्ग बंद.

आकोट : आकोट तालुक्यात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरूनवाहत आहेत. मोहाळी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने आकोट-हिवरखेड मार्ग बंद पडला तर अंजनगाव मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही गावातील नदीकाठच्या घरात व शेतात पाणी शिरले आहे. आकोट शहरातील अनेक चौकात, रस्त्यावर पाणी साचले. आठवडी बाजारसुद्धा मोठय़ा प्रमाणात भरला नव्हता. दरम्यान पावसाचा जोर पाहता महसूल प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सातपुड्यामधून येणार्‍या पाण्याने आकोट-हिवरखेड मार्गावरील ५२ नदी-नाल्यांना पूर आला होता. आकोटनजीक मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. दोन्ही बाजूला वाहनाची रांग लागली होती. काही दुचाकी व प्रवाशांनी जीव धोक्यात घालत रेल्वेपुलावरून मार्ग काढला होता. शिवाय अकोट-अंजनगाव राज्य मार्गांवर वृक्ष उन्मळून पडल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. तालुक्यातील शेतात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. गावातील सखल भागात तसेच गावानजीक नाल्यामधून पाणी वाहत होते. आकोट रेल्वेस्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी साचले होते तर बसस्थानकजवळील जिजामाता नगर ते हिवरखेड मार्गावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. पाणी वाहून नेणार्‍या नाल्या कुचकामी ठरल्याने अनेकजण नालीमध्ये पडले. या भागातील घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले. शहरातील शौकतअली चौक, सोनू चौक, जिनगरवाडी आदी भागात पाणी साचले होते. शहरातून वाहणार्‍या लेकुरवाडी नाल्याला पूर आला होता. दरम्यान आज आठवडी बाजार असल्याने आकोट आगारातून सर्व बसेस सोडण्यात आल्या. परंतु, प्रवासी संख्या रोडावली होती. तालुक्यात पुरामुळे बाधित होणार्‍या केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, करोडी व आकोट परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार पाटील यांनी सांगितले.