शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडला दमदार पाऊस

By admin | Updated: July 10, 2014 22:34 IST

रिसोडात तालुक्यात दमदार बसणार्‍या या पावसाने वाशिमसह कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालुकावासीयांना पुन्हा एकदा निराश केले आहे.

वाशिम : यंदा मृग नक्षत्रापासून दडी मारून बसलेला पाऊस १0 जुलैला जिल्हावासीयांवर किंचितसा मेहेरबाण दिसून आला. मात्र, रिसोडात तालुक्यात दमदार बसणार्‍या या पावसाने वाशिमसह कारंजा, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालुकावासीयांना पुन्हा एकदा निराश केले आहे. यंदा मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांनी पेरण्या उरकल्या होत्या. परंतु मृगात रिमझिम बसणार्‍या पावसाने त्यानंतर मात्र अचानक दडी मारली. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. शेतकर्‍यांनी पेरलेली बियाणे अंकुरली खरी, मात्र पावसाअभावी यातील बहुतांश पिके करपू लागली होती. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले होते. पाऊस बरसावा यासाठी जिल्हावासीयांनी वरूणराजाला साकडे घालण्यास सुरूवात केली होती. गत आठ दिवसांपासून नभांगणात ढगांची मांदीयाळी दिसत असली तरी, प्रत्यक्षात पाऊस येत नव्हता. परंतु १0 जुलैला दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पावसाने अचानक हजेरी लावली. रिसोडात हा पाऊस दमदार बरसला. मात्र वाशिम, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यावासीयांची पावसाने पून्हा एकदा निराशा केली. या पाचही तालुक्यात सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. मात्र पाऊस रिमझिमच झाला. ** यंदा पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयांची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे बर्‍याच गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पाऊस आल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी नागरिकांसह प्रशासनाची अपेक्षा होती मात्र अद्यापही जोरदार पाऊस न बरसल्याने टंचाईची चिंता कायम आहे. पाऊस नसल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभा आहे. पाणी टंचाई सोबतच चारा टंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर घोंगावत आहे. पाऊस नसल्यामुळे प्रशासनाने टंचाईच्या उपाययोजनांना मुदतवाढ दिली आहे.