शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संयम संपला; ग्रामीण भागात पेरणीची लगबग

By admin | Updated: July 13, 2014 00:53 IST

कपाशी व सोयाबीनचीही वेळ निघून जाणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी अल्प पावसातच पेरणीला सुरुवात केली आहे.

अकोला: जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी जिल्हय़ात पेरणीयोग्य पाऊस पडला नाही; मात्र त्यानंतरही पेरणीला उशीर झाल्यामुळे पावसाच्या अपेक्षेने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. पेरणीची वेळ निघून गेली असून, मूग व उडीद या पिकांची पेरणी केल्यावरही उत्पादन येणार नाही. आणखी काही दिवस पेरणी केली नाही तर कपाशी व सोयाबीनचीही वेळ निघून जाणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी अल्प पावसातच पेरणीला सुरुवात केली आहे. गत काही वर्षांपासून जिल्हय़ात एकूण क्षेत्रावर सोयाबीनची ६0 टक्के पेरणी करण्यात येत होती. यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनची आतापर्यंत केवळ ३0७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाची १२६0४.४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही केवळ ७ टक्के असून, एकूण लक्ष्याच्या तुलनेत केवळ १0 टक्के पेरणी करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे ओलिताची व्यवस्था आहे, त्यांनी जून महिन्यातच पेरणी केली होती. आकोट तालुक्यात कपाशीची १९३0 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यात ३४२८ हेक्टरवर, बाळापूरमध्ये २१५0, पातूर १२00, अकोला ३४३.४, बाश्रीटाकळी २७५९, मूर्तिजापूर ७९२ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे, तर सोयाबीनची तेल्हारा तालुक्यात २३८ हेक्टरवर, बाश्रीटाकळी ३३ तर मूर्तिजापूर तालुक्यात ३६.२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. . १00 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.