शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

तेली समाजाच्या परिचय मेळाव्याला उत्स्फरूत प्रतिसाद

By admin | Updated: January 6, 2015 01:26 IST

२५0 युवक-युवतींनी दिला परिचय.

अकोला : संताजी नवयुवक मंडळाच्यावतीने रविवारी अकोला येथे आयोजित उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात २५0 च्या वर युवक-युवतींनी परिचय दिला. मेळाव्याला राज्यातील विविध जिल्ह्यातील समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तिळवण तेली समाज विकास संस्था द्वारा संचालित संताजी नवयुवक मंडळाच्यावतीने सलग ७ व्या वर्षी युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कौलखेड येथील समाज भवनाच्या समोर प्राजक्ता कन्या विद्यालयाच्या पटांगणात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन अकोला जिल्हा कारागृहाचे अधीक्षक जाधव व अकोला महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तिळवण तेली समाज विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप क्षीरसागर होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे उपाध्यक्ष विष्णूपंत मेहरे, कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक संजय गुल्हाने, रमेश चौधरी, नगरसेवक पंकज गावंडे, नांदगाव खंडेश्‍वर पोलीस स्टेशनच्या एपीआय शुभांगी आगाशे, वर्धा येथील पीएसआय ममता अफुने, यवतमाळ येथील राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग पंच अविनाश लोखंडे, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ दहापुते, बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित नालट, दिग्रस येथील श्याम पाटील, यांच्यासह संताजी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष आनंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजाच्या एकोप्यासह परिचय मेळाव्याचे आयोजन ही काळाची गरज बनली असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ह्यरेशीमगाठीह्ण या परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. दुपारच्या सत्रात २५0 च्या वर युवक-युवतींनी आपला परिचय दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. किरण वाघमारे यांनी तर आभार दिलीप क्षीरसागर यांनी मानले.