शिवाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:41+5:302021-02-05T06:14:41+5:30
स्काउट गाईड शिबिरासाठी नोंदणी करा राजनखेड: शिबिरासाठी शिक्षणाधिकारी व भारत स्काउट गाईड जिल्हा मुख्य आयुक्त डाॅ वैशाली ...

शिवाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
स्काउट गाईड शिबिरासाठी नोंदणी करा
राजनखेड: शिबिरासाठी शिक्षणाधिकारी व भारत स्काउट गाईड जिल्हा मुख्य आयुक्त डाॅ वैशाली ठग यांच्या आदेशानुसार बार्शीटाकळी तालुकास्तरिय भारत स्काउट गाईड शिबिर २८ जानेवारीला पंचायत समिती येथे आयाेजन केले आहे.
बार्शीटाकळीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयाेजित केले आहे. सर्व जि.प. शाळांनी व माध्यमिक शाळांनी नाेंदणी करावी. असे जिल्हा संघटक साेनिया शिरसाट, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव, तालुका प्रतिनिधी राजेश पातळी, नामदेवराव जाधव, अरूण धांडे, रमेश जाधव, रमेश चव्हाण यांनी कळविले.
उरळ पाेलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन
उरळ: येथील पोलीस ठाण्यात ठाणेदार अनंत वडतकार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी, पत्रकार उगले, प्रल्हाद नेमाडे उपस्थित होते. तसेच येथील बँकेतही ध्वजारोहण करण्यात आले. शिवशंकर विद्यालयात संस्थाध्यक्ष रामेश्वर पोहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नाहिद यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.