अकोला : वन्यजीव विभाग अकोलाचे उपवनसंरक्षक विजय गोडबोले यांची २३ ऑगस्ट रोजी जालना येथील वनरक्षक प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. त्यांचा प्रभार सध्या सहा. उपवनसंरक्षक रमेश दुबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वन्यजीव विभाग अकोला कार्यालयाच्या अंतर्गत जिल्ह्यातील काटेपूर्णा व बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा अभयारण्य येते. या दोन अभयारण्याकरिता उपवनसंरक्षक कार्यालय अकोला येथे आहे. या कार्यालयात गत काही वर्षांपासून विजय गोडबोले कार्यरत होते. त्यांची जालना येथे बदली करण्यात आली असून, नव्या अधिकार्यांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}