शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे बदलले विवाहाचे स्थळ

By admin | Updated: May 9, 2017 19:53 IST

परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, याची झळ विवाह सोहळ्याच्या आयोजनाला बसत आहे.

आगर परिसरातील चित्रआगर: परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, याची झळ विवाह सोहळ्याच्या आयोजनाला बसत आहे. येथून जवळच असलेल्या हातला लोणाग्रा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता येथील पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचे स्थळच बदलले असल्याचे चित्र आहे. खारपाणपट्टय़ातील आगर व परिसरातील हातला, लोणाग्रा येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता ग्रामस्थांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचे स्थळच बदलणे सुरू केले आहे. पाणीटंचाईमुळे जेथे पाणी असेल त्या गावात विवाह करण्यास पालक उत्सुक असल्याचे चित्र आहे. परिसरातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी स्वाक्षरीचे निवेदन पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात दाखल केले. या प्रकाराबाबत लक्ष देण्याची मागणी केली आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी कळविले आहे. याचा परिणाम लग्नसमारंभावर होत असल्याचे दिसून येत आहे. हातला येथील चक्रधर कसुरकार यांच्या वैशाली नामक मुलीच्या विवाह सोहळा बाखराबाद येथील योगेश माळी यांच्याशी आयोजित करण्यात आला होता; पण पाणीटंचाईमुळे सदर विवाह सोहळा ७ मे रोजी उगवा फाट्यावरील काशी विश्‍वनाथ महाराज मंदिर येथे पार पडला. पाणीटंचाईमुळे लग्नस्थळ बदलण्याची वेळ खारपाणपट्टय़ातील गावांवर आली आहे. (वार्ताहर)