शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राठोड, केसरी, नासीरवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Updated: December 23, 2014 00:54 IST

चौकशी अहवालात तिघांवर ठपका, महिला अधिका-यांचा छळ व नियमबाहय़ प्रतिनियुक्तीचे प्रकरण.

सचिन राऊत /अकोलालोकसेवा आयोगामार्फत शासकीय सेवेत असलेल्या महिला अधिकार्‍यांचा मानसिक छळ करणे, तसेच साहाय्यक संचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या कर्मचार्‍यांच्या नियमबाहय़ प्रतिनियुक्त्यांची चौकशी आटोपली असून, या चौकशी अहवालामध्ये साहाय्यक संचालक हिवताप डॉ.एम. एम. राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी हनुमानप्रसाद केसरी व नासीर हुसेन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. प्राथमिक स्वरूपात हे तिघेही दोषी असून, त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. ह्यलोकमतह्णने हा प्रकार उजेडात आणताच सदर प्रकरणाची गंभीर देखल घेऊन ही चौकशी करण्यात आली होती. साहाय्यक संचालक हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकार्‍याचे कुठलेही कारण नसताना वेतन रोखणे, द्विअर्थी शब्दात त्यांच्याशी बोलणे, वारंवार फोन करून मानसिक छळ करणे, तक्रार केल्यास वाईट परिणाम होतील, अशा शब्दात धमकी दिल्याप्रकरणी विशाखा समितीकडून साहाय्यक संचालक डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी हनुमानप्रसाद केसरी व नासीर हुसेन यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी अहवालामध्ये तिघांवरही ठपका ठेवून त्यांना प्राथमिक स्वरूपात दोषी ठरविण्यात आले असून, हा चौकशी अहवाल आरोग्य संचालक मुंबई व सहसंचालक पुणे यांच्याकडे येत्या दोन दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे. यासोबतच पाचही जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात झालेल्या नियमबाहय़ प्रतिनियुक्त्यांची चौकशी करण्यात आली असून, या चौकशीमध्येही डॉ. राठोड, केसरी हे दोघेही दोषी आढळून आले आहे.हा चौकशी अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आरोग्य सेवेचे सहसंचालक पुणे यांच्याकडे पाठविला असून, सहसंचालक पुणे यांनी साहाय्यक संचालक हिवताप डॉ. एम. एम. राठोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य संचालक मुंबई यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात आता तिघांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर आरोग्य उपसंचालक व विशाखा समितीने दखल घेऊन तत्काळ चौकशी सुरू केली. या गंभीर प्रकरणाची चौकशी आटोपली असून, तिघांवरही दोषी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.